text

Krupasindhu, a Quadra lingual magazine, is published in Marathi (Monthly), English (Quarterly), Hindi (Quarterly) and Gujarati (Bi-monthly) at present.Owner - Shree Dattaguru Publications, Printer & Publisher, Editor - Ajit Padhye, Retail Price - 20Rs., Subscription fee - 200Rs.

Search This Blog

Saturday, 14 April 2012

अनुभव कथन : १४ फुटांवरून पडूनही....- अतुलसिंह अहिरे


१४ फुटांवरुन पडूनही.....
(एप्रिल २०१२, पान क्रं : ५)
(हा अनुभव "मनः सामर्थ्यदाता" वेबसाईट वरुन घेण्यात आला आहे.)
अचानक....मी ज्या शिडीवर चढलो होतो त्या शिडीचा वरचा भाग पिनमधून निघाला आणि माझा तोल जाऊन काही समजण्याच्या आत मी खाली पडलो! त्यावेळेस मी बापूरायाला हाकही मारू शकलो नाही. मी जवळपास १२ ते १४ फुटांवरुन खाली पडलो. पण नवलाची गोष्ट अशी की अशा परिस्थितीत मी उभाच्या उभा पडलो, जणू माझ्या बाप्पानेच मला पकडले आणि अलगद आणुन जमिनीवर ठेवले. फक्त माझ्या पायांच्या टाचांना मार लागला होता. रक्ताचा एक थेंबही निघाला नव्हता. इतर कुठेच लागले नव्हते. आजूबाजूला असलेल्या सामानात पडलो असतो तर मार लागून जिवंत राहिलो नसतो. केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरुंची कृपा म्हणून मी आज जिवंत आहे......
मेकॅनिकल इंजिनियर असणार्‍या अतुलसिंह अहिरे यांचा चित्तथरारक अनुभव वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.



अधिक माहिती साठी : 


संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६


नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...


Friday, 13 April 2012

अनुभव कथन : अनघा गोखले, चिंचवड




ज्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण। 
तयासी कैचे भय दारुण ।
(अंक : एप्रिल २०१२, पान क्रमांक : ३)

जेव्हा आपत्ती कोसळते तेव्हा सामान्य मनुष्याला गांगरून जायला होते व टेन्शनखाली आपल्या हातून चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याऐवजी सदगुरुतत्त्वाला शरण गेल्यामुळे शांत मनाने सर्व निर्णय घेता येतात. सदगुरुला शरण गेले, त्याच्यावर भार टाकला की प्रथम मन शांत होते. मन शांत झाले की बुद्धी काम करू लागते व योग्य निर्णय घेता येतात आणि हा अनुभव जवळपास प्रत्येक बापुभक्ताने कधी ना कधी घेतलेलाच असतो की जेव्हा आपण आपल्या समस्यांशी झुंजताना मानवी प्रयत्न थकल्यानंतर, अनन्यभावे बापूवर भार टाकतो, त्याला शरण जातो तेव्हा तोही आपण टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही.........
हेच सांगणारा चिंचवडच्या अनघा गोखले यांचा त्यांच्या आईबाबतचा अनुभव.....वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधू मासिक राखून ठेवा...सर्व स्टॉलवर उपलब्ध....

अधिक माहिती साठी : 
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६

Friday, 2 March 2012

अनुक्रमणिका (मार्च महिन्याचा अंक)

  • संपादकीय अजित पाध्ये ....................................................................................०२
  • भिंत कोसळण्याअगोदरच (अनुभव कथन) अरूणा जोशी, नाशिक..................................०३
  • जेथे जातो तेथे तू माझा सांगाती (अनुभव कथन) दर्शना सावंत....................................०६
  • आमचा बापू सदैव आमच्या बरोबर ! (अनुभव कथन)  – माधवी शिर्वटकर, ताडदेव.............०७
  • दोडूपडू चाले बाळ, आधारी बापुमाय l (अनुभव कथन)  – श्रियाविरा भाटकर, दादर..............०९
  • आमचा बापू तर लईच ग्रेट (अनुभव कथन)  – मुग्धा दुर्वे, कल्याण..............................११
  • तुझा विसर न व्हावा (अनुभव कथन) नीता केंजलकर............................................१२
  • जोवरी ह्या देही श्‍वास l निजकार्यास साधूनी घ्या (अनुभव कथन)  – राहूलसिंह संत, नाशिक.............................................................................................................१४
  • इतर देव सर्व मायिक, गुरुची शाश्‍वत देव एक! (अनुभव कथन) राकेश फुले / राधा फुले, सातारा ............................................................................................................१६
  • आम्ही त्या जागेवरून उठून बाजूला गेलो मात्र.... (अनुभव कथन) एस. एस. पन्हाळकर, रत्‍नागिरी .........................................................................................................१९
  • काळ आला होता पण वेळ आली नव्हती - (अनुभव कथन) संतोष वाघुले ......................................................................................................................२१
  • सर्व संकटाहून माझा बापू मोठा - (अनुभव कथन) – सुकुमार चिवटे, डोंबिवली .................२३
  • चरम कृपालु बापु अनुरागी (अनुभव कथन) वैशाली नाईक, पुणे….................................२६
  • रुद्रगौरीहरुद्रा डॉ. योगिंद्रसिंह जोशी….......................................................................२८
  • असं कसं? संजीवसिंह सुळे, वडगांव ......................................................................३३
  • कृपासिंधु तू, तू अनिरूध्द  – सदानंदसिंह वर्तक ..........................................................३८
  • तूं मजकडे अनन्य पाहीं आजितसिंह पाध्ये…............................................................४६
  • हाचि नववा नववा आगळा –  भूपालसिंह आपटे........................................................५२

रुद्रगौरीहरिद्रा



माघ पौर्णिमा शके १९३३ म्हणजेच दिनांक ७ फेब्रुवारी २०१२ हा दिवस सर्व श्रध्दावानांसाठी ’सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला’ असाच होता. या दिवशी सद्‌गुरु श्रीअनिरुध्दांनी म्हणजेच बापुंनी श्रीगुरुक्षेत्रम्‌ येथे रेणुकामातेस म्हणजेच शिवगंगागौरीस अभिवन्दन करून तिच्याच अनुमतिने सर्व प्रकारच्या अरिष्टांचे अशुभांचे स्तम्भन करणार्‍या आणि पवित्र, मंगल व शुभाला आधार देणार्‍या या किरातरुग्रपत्‍नीच्या कृपाप्रवाहाचे मूर्तिमन्त स्वरूप असणारी ’रुद्रगौरीहरिद्रा’ सर्व श्रध्दावानांसाठी उपलब्ध करून दिली का?...... (हे जाण्यासाठी आजच वाचा मार्च महिन्यातील कृपासिंधु मासिकाचा अंक)

- डॉ. योगीन्द्रसिंह जोशी